शाळेच्या आरक्षणावर अध्यात्मिक केंद्र उभारण्याचा घाट, सामाजिक कार्यकर्त्याने नगर परिषदेकडे नोंदवली हरकत 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरातील आरक्षण क्रमांक 106 येथे प्राथमिक शाळेचे आरक्षण असताना ते आरक्षण बदलून त्या ठिकाणी अध्यात्मिक केंद्राचे आरक्षण करण्याचा घाट रत्नागिरी नगरपरिषद रचत असून त्यावर आपण हरकत घेतली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अमेय परूळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 37(1) नुसार आरक्षणात छोटासा बदल करता येतो शाळेच्या जागेवर अध्यात्मिक मंदिर उभे करू शकत नाही असे अमेय परूळेकर यांनी स्पष्ट सांगितले.

रत्नागिरी शहरातील आरक्षण क्रमांक 106 येथे प्राथमिक शाळेचे आरक्षण असताना ते आरक्षण बदलून त्या ठिकाणी अध्यात्मिक केंद्राचे आरक्षण करण्याच्या संदर्भात वर्तमानपत्रात एक जाहिरात आली होती. त्या जाहिरातीमध्ये आरक्षण बदलाबाबत हरकती पाठवा. मात्र त्यावर सुनावणी कधी घेणार हे नगरपरिषदेने सांगितले नव्हते. आपण याबाबत हरकतीचे पत्र प्रशासकांना दिले असल्याचे अमेय परूळेकर यांनी सांगितले.

परूळेकर पुढे म्हणाले की, जाहिरातीमध्ये दामले हायस्कूलचा उल्लेख करण्यात आला आहे ती शाळा खूप जुनी आहे.आता रत्नागिरी शहराची लोकसंख्या वाढली आहे.मात्र त्याप्रमाणात प्राथमिक शाळांची संख्या वाढलेली नाही.त्यामुळे आरक्षण क्रमांक 106 हे शाळेसाठीचे आरक्षण असून तिथे शाळा सुरू होणे आवश्यक आहे.तसेच 37(1) नुसार आरक्षणात छोटे बदल करता येतात मूळ गोष्ट बदलता येत नाही.त्यामुळे शाळेच्या जागी अध्यात्म मंदिर करता येणार नाही तसेच हरकती मागवताना नगरपरिषदेने सुनावणी ठेवणेही आवश्यक असल्याचे अमेय परूळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.