
राज्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱयांना फायदा होण्याबरोबरच वाईन उद्योगाला चालना मिळण्यासाठी सुपरमार्पेटमध्ये वाईन विक्रीला मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने दिले आहे. या निर्णयावर राज्य सरकारने 29 जूनपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत.
राज्यातील सुपर मार्पेट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून सेल्फ इन शॉपद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात सुधारणा करण्यासंदर्भात नागरिकांनी 29 जूनपर्यंत हरकती किंवा सूचना पाठविण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी केले आहे.
या हरकती किंवा सूचना दि. 29 जूनपर्यंत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- 400023 यांच्याकडे टपालाद्वारे अथवा dycomm [email protected] या ई-मेलवर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिसूचनेचा मसुदा राज्य उत्पादन शुल्क विभागाची वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रकाशित करण्यात आला आहे.
वेबसाईट http://statee²cise.maharashtra.gov.in


























































