
ओडीशामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आला मात्र प्रसंगावधान दाखवत त्याने 48 प्रवाशांचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत हृदयविकाराच्या झटक्यामुळे चालकाचा मृत्यू झाला.मात्र त्यापूर्वी त्यांनी बसमधील प्रवाशांची काळजी घेत त्यांच्या प्राणांचं रक्षण केलं.
सना प्रधान असे या चालकाचे नाव होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ओडीशा येथील कंधमाल जिल्ह्यातील पाबुरिया गावाजवळ ही घटना घडली. भुवनेश्वरला जाणाऱ्या बसमधील 48 प्रवासी थोडक्यात बचावले. चालकाला हृदयविकाराचा झटका आला पण सतर्कता राखून बस भिंतीवर आदळले, त्यामुळे बस थांबली. पोलीस अधिकारी कल्याणमयी सेंधा यांनी सांगितले की, मा लक्ष्मी ही खाजगी बस साधारणपणे दररोज रात्री कंधमालमधील सारंगढ ते जी उदयगिरी मार्गे भुवनेश्वरला जाते. बस चालवताना अचानक सना याच्या छातीत दुखू लागले आणि त्याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले.आपल्याला पुढे गाडी चालवता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळली आणि गाडी थांबली आणि प्रवाशांचे प्राण वाचले.
घटनेनंतर चालकाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत घोषित केले. या त्यानंतर काही वेळाने बस प्रवाशांसह निर्धारीत स्थळी नेण्यात आले. कारण बसमध्ये पर्यायी चालक होता. प्रधान यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगितले. तसेच तपास सुरू करण्यात आल्याचे सेंधा यांनी सांगितले.




























































