अजबच! या मुलींना आहे दोन डोकं, तीन हात आणि एक शरीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
child

एका महिलेने रविवारी एका खासगी रुग्णालयात जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. मात्र दोन डोकं आणि तीन हात असलेल्या मुलींचे शरीर मात्र एक असल्याची दुर्मिळ घटना असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. मुलींच्या शस्त्रक्रियेसाठी पालकांनी ओडिशा सरकारला मदतीसाठी हाक मारलेली आहे.

ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यात रविवारी अंबिका परिदा या महिलेला प्रसुतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते.  या महिलेचे सिझेरिअन करण्यात असून त्यांना रविवारी जुळ्या मुली झाल्या. मात्र या मुलींसोबत अजब घटना घडली आहे. दोन डोकं, तीन हात असलेल्या या मुलींचे शरीर एकच आहे. मात्र या मुलींचे आई-वडील शेतकरी असून त्या महिलेचे हे दुसरे बाळंतपण आहे.

याबाबाबत केंद्रपाडा जिल्हा रुग्णालाचे बालरोग तज्ज्ञ देबाशीष साहू यांनी सांगितले की, नवजात मुलींचे डोके पूर्णपणे विकसित आहे. त्यांना दोन डोकं, दोन नाक आहेत. या जुळ्या बहिणींचे शरीर मात्र एक असून तीन हात आणि दोन पाय आहेत.त्यानंतर या मुलींना प्रगत उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुलींचे आरोग्य उत्तम आहे.

हे दांपत्य शेतकरी असून मुलींवर शस्त्रक्रिया त्यांना परवडणारी नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलींना दोनवेळचं जेवण देण्याएवढी त्यांची परिस्थिती आहे. महागडे उपचार आम्हाला परवडणारे नाहीत. मुलींच्या सेप्रेशनसाठी ओडीशा सरकारला मदत करण्यासाठी आर्त हाक मारली आहे.