
सामना ऑनलाईन । उत्तर प्रदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. सलमान अहमद असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याचा जामीन अर्ज न्यायामूर्ती केपी सिंह यांनी फेटाळला आहे.
मूळचा महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या नदीम खान याच्या बनावट सोशल मीडिया अकाऊंटवरून सलमानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहली होती. त्या पोस्ट मध्ये त्याने पंतप्रधानांना गोळ्या घाला असे आवाहन केले होते. तसेच पाकिस्तान जिंदाबादचा जयघोष देखील केला होता. त्याच्या या पोस्ट विरोधात गाजियाबादमधील निठोर गावचा रहिवासी असलेल्या सत्य प्रकाश चौधरीने 16 जून 2018 रोजी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. या पोस्टवरून पोलिसांनी नदीम खानला अटक केली होती. त्यानंतर त्याने ते त्याचे अकाऊंट नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अधिक तपास केला असता हा प्रकार सलमान अहमदने केल्याचे समोर आले. सलमान व नदीममध्ये काही कारणास्तव वाद झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी सलमानने नदीमचे बनावट अकाऊंट तयार करून त्यावरून पंतप्रधान विरोधात गरळ ओकली होती.
याप्रकरणी सलमानला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तिथे त्याचा अर्ज फेटाळण्यात आलेला त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता मात्र उच्च न्यायालयाने देखील त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.






























































