पॉर्न व्हिडीओ दाखवून ओला चालकाचं महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

मुंबईत रिक्षाचालकाने महिलेसमोर हस्तमैथुन केल्याची घटना ताजी असतानाच बेंगळुरू येथे ओला चालकाकडूनही असाच प्रकार घडल्याचं समोर येत आहे. एका २२ वर्षीय तरुणीसमोर पॉर्न व्हिडीओ बघत एका ओला कॅबचालकाने हस्तमैथुन केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.

बेंगळुरू येथील कबन पार्क परिसरात ही घटना घडली आहे. ही २२ वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने कबन पार्क येथून आपल्या ऑफिसच्या दिशेने जाण्यासाठी सकाळी साडे सहाच्या सुमाराला ओला कॅब बोलवली होती. कॅबने प्रवास सुरू केल्यानंतर काही वेळाने तिच्या लक्षात आलं की कॅबचालक तिच्याकडे रोखून बघत आहे. त्यानंतर त्याने डाव्या हातात त्याचा मोबाईल पकडून त्यात पॉर्न व्हिडीओ सुरू केला आणि हस्तमैथुन करू लागला. त्याने जाणूनबुजून फोन डाव्या हातात पकडला होता, जेणेकरून तरुणीही तो व्हिडीओ पाहू शकेल, असं या तक्रारीत म्हटलं आहे.

या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने त्याला कॅब थांबवायला सांगितली. मात्र, त्याने तसं न करता तिला तिच्या इच्छित स्थळी गेल्यावरच कॅब थांबवली. त्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या कॅबचालकाची ओळख पटवली असून त्याचं नाव देव समोलिया असं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर, ओला कॅबच्या प्रवक्त्याने सदर चालकाला ओलाच्या सेवेतून बडतर्फ केल्याचंही म्हटलं आहे.

summary- ola cab driver sexually harassed woman in bengaluru