जुनं एटीएम मशीन विकत घेतलं, उघडून पाहिलं तर आत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काहींना जुन्या वस्तू जमा करण्याचा छंद असतो. काही जण अशा जुन्या वस्तू बाजारात विकून चांगला नफा कमावतात. असाच काहीसा प्रकार काही तरुणांबाबत घडला आहे.

काही तरुणांनी जुनं एटीएम मशीन खरेदी केलं. ते एटीएम मशीन त्यांना 300 डॉलरला मिळालं. त्यांना हे मशिन उघडून पाहायचं होतं. त्यात रोख रक्कम असल्यास त्यामुळे या तरुणांचा फायदा होणार होता.

त्यामुळे त्यांनी हे मशिन विकत घेतलं. जो हे मशिन विकत होता, त्याने मशिनची किल्ली त्यांना दिली नव्हती. त्याने या तरुणांना स्वतःहूनच ते मशिन उघडण्याचा सल्ला दिला होता.

त्यानुसार त्यांनी ते मशिन उघडलं. त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. अनेक टूल्सच्या मदतीने त्यांनी ते मशिन उघडलं. आत पैसे ठेवण्याच्या पत्र्याच्या पेट्या होत्या.

त्या पेट्या उघडल्या तेव्हा त्यांना आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसला. कारण त्यात तब्बल 2 हजार डॉलर्स होते. त्यांना हा सौदा चांगलाच फायद्याचा ठरला होता. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होताना दिसत आहे. त्यात त्यांची एटीएम उघण्याची खटपट तसंच पैसे मिळाल्याचा आनंद दिसून येत आहे.