मालवणमध्ये दोन वर्षीय बालिकेवर वृद्धाकडून अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी | मालवण

दोन वर्षीय बालिकेला खेळण्याच्या बहाण्याने घरात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी मालवण शहारात घडली आहे. याप्रकरणी पीडित बालिकेच्या पालकांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून फ्रान्सिस बस्त्याव रेबेलो या ६६ वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार १२ ऑगस्ट दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास फ्रान्सिस याने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या एका दोन वर्षीय बालिकेस खेळण्याच्या बहाण्याने घरात नेले. त्यांनंतर तिच्यावर अत्याचार केला व शिवीगाळ केली. त्यानंतर मुलीची अवस्था पाहून धक्कादायक प्रकार पालकांच्या समोर आला.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली. पोलिसांनी बलिकेची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर फ्रान्सिस याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला सोमवारी जिल्हा विशेष न्यायालयात हजर केल्यावर न्यायालायने १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.