ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार फरार

दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा हिंदुस्थानचा कुस्तीपटू सुशीलकुमार याच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे. नवी दिल्लीतील छत्रसाल येथे झालेल्या भांडणात 23 वर्षीय युवा कुस्तीपटू सागर राणा याचा मृत्यू झाला. या प्रकरणात सुशीलकुमारचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला, पण सुशीलकुमार फरार आहे. नवी दिल्लीतील पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस बजावली आहे.

सुशीलशिवाय इतर 20 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस एनसीआर प्रदेश आणि आसपासच्या राज्यांत छापा टाकत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल टाऊन परिसरातील फ्लॅट रिकामा करण्यासाठी हा वाद सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रिन्स दलालला सुरुवातीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार आणि त्याचे अन्य साथीदार भांडणात सहभागी होते. सागरला तातडीने रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या