
ओमायक्रोन धोक्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने अलर्ट होत दहा जम्बो कोविड सेंटर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या दहा जम्बो कोविड सेंटरमुळे 13466 बेड उपलब्ध होणार आहेत. सद्यस्थितीत पाच जम्बो कोविड सेंटर कार्यरत आहेत. मुंबईत अचानक रुग्णवाढ झाल्यास गैरसोय होऊ नये यासाठी ही व्यवस्था तैनात ठेवण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबईत सद्यस्थितीत कोरोना पूर्ण नियंत्रणात असून दैनंदिन रुग्ण संख्येत चांगलीच घट झाली आहे. निर्बंध शिथील केल्यानंतर थेट 500 पर्यंत गेलेली दैनंदिन रुग्ण संख्या आता 100पर्यंत खाली आहे.
सद्यस्थितीत 1 डिसेंबरपर्यंत फक्त 1904 सक्रिय रुग्ण असून यातील निम्म्याहून जास्त जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तर रुग्णदुपटीचा कालावधीही आता थेट दोन हजार दिवसांपर्यंत गेला असून रुग्णवाढीचा दर 0.02 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. असे असले तरी मुंबईत ओमायक्रोन प्रभावित देशातून आलेल्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने पालिका सतर्क होऊन आरोग्य यंत्रणा तैनात ठेवत आहे.
फक्त पाच टक्के बेडवर रुग्ण
सद्यस्थितीत पालिकेचे वरळी-एनएससीआय, मुलुंड, भायखळा, नेस्को गोरेगाव आणि दहिसर चेकनाका ही पाच जंम्बो कोविड सेंटर सुरू आहेत. तर प्रमुख रुग्णालयांसह काही रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर सुरू आहेत.
या सर्व एकूण 17 हजार बेडवर फक्त 600 म्हणजेच पाच ते सहा टक्के रुग्ण आहेत. तर सक्रिय सुमारे 2 हजार रुग्णांपैकी बाराशे रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.
गरज भासल्यास दहा जम्बो कोविड सेंटर आणि इतर रुग्णालयांमधील बेड कायान्वित केल्यास 30 हजार बेड उपलब्ध होतील, अशी माहिती काकाणी यांनी दिली.
उपलब्ध बेड संख्या
दहिसर, कांदरपाडा – 700
मालाड जम्बो – 2200
नेस्को गोरेगाव फेज 1 – 2221
नेस्को गोरगाव फेज 2 – 1500
बीकेसी कोविड सेंटर – 2328
कांजूरमार्ग कोविड – 2000
शीव जम्बो कोविड – 1500
आरसी भायखळा – 1000
आरसी मुलुंड जम्बो – 1708
































































