दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे उद्या वैद्यकीय शिबीर; गुणवंतांचा गौरव

मुंबईचे शिल्पकार, हिंदुस्थानी रेल्वेचे जनक जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या 221 व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद आयोजित आणि समाजश्रेष्ठ डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या वतीने रविवार, 26 मे रोजी वैद्यकीय शिबीर, व्याख्यानमाला, नवदुर्गांना पुरस्कार आणि सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे.

दादरच्या आगर बाजार एन. एम. काळे मार्ग येथील महाराष्ट्र हायस्पूलच्या सिद्धिविनायक सभागृहात सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत नेत्रचिकित्सा कार्यक्रम तर सकाळी 11 ते 12 दरम्यान मोफत वॉकिंग स्टिक्स, मोफत व्हीलचेअर्सचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, यावर डॉ. दर्शना शिरोडकर-गाडगीळ मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12 ते 1.30 या वेळेत गुणवंतांना जीवनगौरव तसेच महिलांना नवदुर्गा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी संपर्प ः चंद्रशेखर दाभोळकर – 9004170614, डॉ. राम चव्हाण – 9821075642, सुनील देवरुखकर 9664640969.