दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार्‍या सरकारला पाठिंबा – अरविंद केजरीवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind-kejriwal-aap

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रात भाजपसोडून ज्यांचे सरकार येईल त्यांना आपचा पाठिंबा असेल असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार्‍यालाच आपण पाठिंबा देऊ असा निर्णय केजरीवाल यांनी जाहीर केला आहे.

केजरीवाल म्हणाले की, “निवडणुकीनंतर भाजप सोडून आम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबा देऊ. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे वचन जे सरकार देईल त्यांना आम्ही पाठिंबा जाहीर करू.”

नुकतंच आप आणि काँग्रेसच्या युतीची चर्चा फिस्कटली आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दिक्षित या युतीच्या विरोधात होत्या असे म्हटले जाते. चर्चेच्या अनेक फेरी झडल्या परंतु ही युती अस्तिवात आलीच नाही. आता भाजप सोडून कुठल्याही पक्षाला आपण पाठिंबा देऊ असे केजरीवाल म्हणाले. म्हणजेच उद्या आप काँग्रेसलाही केंद्रात पाठिंबा देईल याचे संकेत केजरीवाल यांनी दिले आहे.