वीजमीटर जोडणीसाठी आठ हजाराची लाच स्वीकारली, तंत्रज्ञासह दोघांना रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bribe

नवीन घरातील वीजजोडसह मीटर ट्रान्सफर करण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तंत्रज्ञासह दोघांना एसीबीने रंगेहात पकडले. संदीप दशरथ भोसले (वय 38) प्रधान तंत्रज्ञ आणि हरी लिंबराज सुर्यवंशी (वय 22) असे रंगेहात पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या नवीन घरामध्ये वीजजोड करून मीटर घ्यायचा होता. त्यासाठी वितरणचा तंत्रज्ञ संदीप भोसले याने तक्रारदाराकडे आठ हजारांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर आज कारवाई करण्यात आली. लाच घेताना सुर्यवंशीसह भोसले यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.