
शास्त्रीय संगीतात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱया, एवढेच नव्हे तर संगीताच्या सर्व दालनातून अतिशय यशस्वीपणे संचार करणाऱया मणिपूरमधील प्रसिद्ध गायिका लैश्राम मेमा यांना रविवारी माय होम इंडिया तर्फे वन इंडिया पुरस्काराने गौरविण्यात आले. यानिमित्ताने अखंड संगीत साधना करणाऱया गायिकेला मानवंदना देण्यात आली.
लैश्राम मेमा यांना खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी गायिका अनुराधा पौडवाल, सारस्वत बँकचे अजयपुमार जैन, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर, अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी आदी उपस्थित होते.
लैश्राम मेमा यांना शास्त्रीय संगीत आवडत असले तरी गझल, सुगम संगीत आदी गीते त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, आसामी भाषेतून गायली आहेत. तसेच त्यांना सामाजिक कार्याची आवडदेखील आहे. त्यामुळे माय होम इंडियाने वन इंडिया पुरस्कारासाठी केलेली त्यांची निवड कौतुकास्पद आहे, असे विनय सहस्त्रबुद्धे यावेळी म्हणाले. दादरच्या वीर सावरकर स्मारक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
माय होम इंडिया ही स्वयंसेवी संस्था ईशान्येकडील लोकांना उर्वरित हिंदुस्थानाशी जोडून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे कार्य करते. यंदा संस्थेने कोरोना काळात ईशान्य हिंदुस्थानातील पाच हजारांहून अधिक नागरिकांना दर महिन्याला अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देण्याचे कार्य केले, अशी माहिती माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी यावेळी दिली.



























































