उधमपूरमध्ये सुरक्षा दलाचा एक जवान शहीद

जम्मू-कश्मीरमध्ये उधमपूरमधील दुडू-बसंतगड आणि दोडाच्या भदरवाह येथील सोजधरच्या जंगलात लष्कर आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुपने शोध मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान, तिथे लपलेल्या जैश दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या चकमकीत जखमी झालेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.