
गेल्या अडीच महिन्यात कोविड संबंधित मुंबई पोलिसांच्या 100 नंबरवर एक लाख तीन हजार 729 कॉलची नोंद झाली आहे. दररोज अनेकजण कोविडशी संबंधित 100 नंबरवर संपर्क साधत असल्याचे चित्र आहे. कोविड बाबत माहिती घेण्यासाठी तसेच तक्रार किंवा माहिती देण्यासाठी नागरिक पोलिसांच्या 100 नंबरवर संपर्क साधत आहेत.
दरम्यान, राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना 270 पोलिसांवर हल्ले झाले असून 854 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय राज्यभरात लॉकडाऊनचा नियम पायदळी तुडवत बेकायदेशीर वाहतुक केल्याप्रकरणी एक हजार 335 वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 83 हजार 161 गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.


























































