लातुरात एक लाख रुपयांची नाणी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

उदगीर तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चौधरी मोड येथे निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने एक लाख रुपयांची नाणी जप्त केली आहेत. तपासणी पथकाने एका गाडीतून ही नाणी जप्त केली असून निवडणुकीदरम्यान त्याचा वापर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात सर्वत्र वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील उदगीर तालुक्यातील घडामोडी येथे तपासणी पथकाने बिदरहून उदगीरकडे जाणारी एक कार अडवली. कारची तपासणी केली असता त्यात तब्बल एक लाख रुपयांची नाणी सापडली. हे पैसे निवडणुकीसाठी वापरले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही नाणी उदगीरचे व्यापाऱ्यांची असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई केलेल्या पथकांमध्ये यशपाल सातपुते, जीलानी शेख, इर्शाद शेख यांचा समावेश होता.निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने एक लाख रुपयांची नाणी जप्त केल्याचा मुद्दा जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.