
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
एनडीएतील आणखी एका घटक पक्षाने भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. लहान पक्षांचा सन्मान तुम्हाला राखावाच लागेल असे अपना दल -सोनेलाल पार्टीचे अध्यक्ष आशीष पटेल यांनी बजावले आहे.
अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांना भाजपने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री बनवले असले तरी त्यांना उत्तर प्रदेशातील स्थानिक कार्यक्रमात भाजपकडून डावलले जाते. भाजपचे हे वागणे बरे नाही, असेही आशीष पटेल यांनी म्हटले आहे.
तेलगू देसमचे चंद्राबाबू आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे उपेंद्र कुशवाह यांनी एनडीएला रामराम ठोकल्यानंतर अपना दलनेही नाराजीचा सूर लावला आहे. भाजपसाठी हा एक धक्काच मानला जात आहे.



























































