पागोटे तलावात आंघोळीसाठी गेलेला तरुण बुडाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

सामना प्रतिनिधी । उरण

उरण तालुक्यातील पागोटे गावातील तलावात आंघोळीसाठी गेलेला ब्रिजेश लाला यादव ( वय 20) हा तरुण बुडाला. मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला ब्रिजेश यादव रोजगारानिमित्त उरणमध्ये आला होता. उरण तालुक्यातील पागोटे गावात तो भाड्याने राहत होता. सोमवारी सकाळी तो भावाला सांगून पागोटे तलावात आंघोळीसाठी गेला होता. पोहता येत नसतानाही तो खोल पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा तलावात बुडून मत्यू झाला. सिडकोच्या अग्निशमन दलाच्या मदतीने ब्रिजेशचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.