शोपियान जिल्ह्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे. या चकमकीत दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या या प्रांतात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शोपियानमधील आशिपोरा भागात दहशतवादी लपल्याची सूचना सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर हिंदुस्थानी सैन्याने संपूर्ण योजना बनवून या प्रदेशाला घेरलं. दहशतवाद्यांनी सैन्याची चाहूल लागताच गोळीबार सुरू केला. त्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. ही चकमक अद्याप सुरू असून अद्याप चार दहशतवादी लपून बसल्याचे वृत्त आहे.