ओएनजीसी केंद्रातील पुरवठा सुरळीत, सीएनजी गॅस भरणा केंद्रे पूर्वपदावर

349

ओएनजीसीच्या उरण येथील प्रकल्पात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील सीएनजी गॅस पुरवठा केंद्रांना पुरेशा दाबाने गॅस मिळत नसल्याने ही केंद्रे शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवस बंद होती. आता ओएनजीसीच्या प्रकल्पातील बिघाड दुरुस्त करण्यात आल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून सीएनजीचा गॅसपुरवठा पूर्ववत आला असल्याचे मुंबई महानगर गॅस लिमिटेडने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्पात झालेल्या तांत्रिक बिघाडाने मुंबई महानगर गॅस लिमिटेडच्या वडाळाच्या सिटी गेट स्टेशनला गॅसचा अपुरा पुरवठा होत असल्याने सीएनजी गॅस केंद्रांचा पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱया रिक्षा, टॅक्सी, परिवहन बस आणि कार चालकांचे वांदे झाले होते. पाईपद्वारे घरगुती (पीएनजी) ग्राहकांच्या गॅस पुरवठय़ावर परिणाम होऊ नये म्हणून सीएनजी गॅस केंद्राचा पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. रविवारी ओएनजीसी प्रकल्पातील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याने आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे मुंबई महानगर गॅस लिमिटेडने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या