मी कांदा खातच नाही! निर्मला सीतारमण यांचे लोकसभेत विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांद्याच्या ( Onion ) किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. हा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriye Sule ) यांनी बुधवारी लोकसभेमध्ये कांदा दरवाढीचा मुद्दा मांडला होता. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmala sitharaman ) उत्तर द्यायला उभ्या राहिल्या. त्यांनी उत्तराला सुरुवात करण्यापूर्वी काही खासदारांनी उपरोधिकपणे ‘तुम्ही कांदा खाता का?’ असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की ‘मी जास्त कांदा-लसूण खात नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे जिथे कांदा-लसूण याला जास्त महत्व नाहीये.’

सुप्रिया सुळे यांनी अनुत्पादीत कर्ज आणि कांदा दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या म्हणाल्या की ‘इजिप्तमधून कांदा मागवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. ही चांगली बाब आहे की कांद्याची व्यवस्था करत आहे. मात्र आज ही वेळ का आली ? आम्ही इजिप्तचा कांदा का खावा?’ सुप्रिया सुळे त्यांच्या भाषणात म्हणाल्या की आपला देश हा अनेक कृषी उत्पादनांची निर्यात करतो. यामध्ये दूध आणि तांदूळाचा समावेश आहे. त्या पुढे म्हणाल्या की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो, मग अचानक त्याचे उत्पादन कसे काय घटले ?

कांद्याचे दर कोलकात्यासारख्या शहरांमध्ये किलोमागे 150 किलोपर्यंत पोहोचले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तयार झालेला कांदा गोदामात ठेवला आहे त्यांना कांदा चोरीला जाण्याची बीती सतावते आहे. मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने त्याचा 30 हजार रुपये किंमतीचा कांदा चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. चोरी टाळण्यासाठी आता या शेतकऱ्यांनी पहारा द्यायला सुरुवात केली आहे.