येवला बाजार समितीत उन्हाळ कांदा आवक टिकून, बाजारभाव तेजीत

765

सप्ताहात येथील मुख्य व अंदरसूल उपबाजार आवारावर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती तर मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत असल्याचे दिसून आले. सप्ताहात एकूण कांदा आवक 22 हजार 664 क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान 1 हजार ते 3140 रुपये, तर सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक 14 हजार 337  क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान 1 हजार ते 3233 रुपये तर सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल होते.

सप्ताहात बाजरीच्या आवकमध्ये वाढ झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. बाजरीस स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात बाजरीची एकूण आवक 213 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान 1901 ते कमाल 2135 रुपये, तर सरासरी 2066 रुपये होते.

सप्ताहात मुगाच्या आवकमध्ये वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. मुगास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मुगाची एकूण आवक 706 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान 5 हजार ते कमाल 6441 रुपये, तर सरासरी 5800 रुपये होते. सप्ताहात सोयाबीनची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. सोयाबीनला स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात सोयाबीनची एकूण आवक 17 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान 3450, कमाल 3560 रुपये तर सरासरी 3500 रुपये होते.

सप्ताहात मक्याच्या आवकमध्ये घट झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. मक्यास व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मक्याची एकूण आवक 10 क्विंटल झाली असून बाजारभाव किमान 2000 ते कमाल 2250 तर सरासरी 2200 रुपये प्रतिक्विंटल होते.

आपली प्रतिक्रिया द्या