
- मंगलाताई खाडिलकर
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई बोऱहाडे यांनी लिहिलेले ‘ओंजळीतील फुले’ म्हणजे एक प्रांजळ अनुभव कथन आहे. पुस्तक कसे असावे? किंवा पुस्तकाचे काही निकष असतात. लेखन कसं असावं? साधं, सोपं, सुटसुटीत, आपल्या आवाक्यातलं आणि प्रामाणिक असावं. एकदा ते प्रामाणिक आणि प्रांजळ असलं की ते लोकांना आवडतं. तुम्ही एकदा पवित्रा घेऊन बोलता किंवा लिहिता त्या वेळेला तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा नसेल तर मग ते लोकांना पटणं कठीण जाते,
एक स्त्र्ााr म्हणून जगताना, एक मुलगी म्हणून वाढताना, आई म्हणून मुलांना वाढवताना, पत्नी म्हणून वावरताना आलेल्या संकटांचा सामना करताना आणि निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय अशा सगळ्या जीवनशैलीतून आपलं स्वतःचं स्वत्व आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जेव्हा माणसाची वाटचाल होते ना त्या वेळेला माणसाला बोलावंसं वाटतं, लिहावंसं वाटतं. कधी कधी काय होतं, आलेल्या संकटांमुळे माणसं इतकी आत आपल्या कोषामध्ये दडून बसतात त्यातून त्यांना बाहेर यावंसं वाटत नाही. मग त्यासाठी त्यांना वेगळा प्रयत्न करावा लागतो.
आपल्याला आपल्या आयुष्यात अडचणी येणार, नको त्या अडचणीसुद्धा येतात. संकटाचे घनघोर प्रसंग येतात, पण त्या वेळेला आपला स्वभाव, आपल्या स्वभावातला धर्म, आपल्याला सगळे अनुभव घेण्याची असोशी आहे ती मिटता कामा नये. जीवनाला सर्वांगीण स्पर्श करण्याची माणसाची हाव हवी, असोशी हवी. मी हे करून बघते, मी ते करून बघते, मला ते येतंय का बघते, मला हे येतंय का बघते, मला हे चांगलं येतंय मी त्याचा उपयोग करून बघते. मी व्यवसाय करून बघते, मी राजकारण करते, पण राजकारणात थेट उडी नाही मारायची. त्याआधी समाजकारण करणे गरजेचे आहे, हे रेखाताईंचं व्यक्तिमत्त्व मला भावते. म्हणून मला रेखाताईंचं काwतुक करावंसं वाटतं.
रेखाताईंच्या आयुष्यातील सर्वच घटना, घडामोडींचा धांडोळा या ‘ओंजळीतील फुले’ या त्यांच्या छोटय़ाशा, पण परिपूर्ण पुस्तकात आलेला आहे. ही ओंजळीतील फुले आणि त्यांचा सुगंध निश्चितच सर्वत्र दरवळेल यात शंका नाही.
‘ओंजळीतील फुले’
लेखिका ः रेखा शांताराम बोऱहाडे
मुद्रक ः श्री. उदय पै, अॅण्ड आर्टस्
पाने ः 130, मूल्य ः रु. 200/-





























































