पैसे घेऊन झाला ऑफलाईन, सेक्स चॅटसाठी नंबर केला व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगली नाही तर पैसे तर बुडतीलच पण नको त्या ठिकाणी तुम्ही अडकण्याची देखील शक्यता आहे. मुंबईतील एका अज्ञात व्यक्तीने वृद्ध दाम्पत्याची अर्थिक फसवणूक केली आणि या दाम्पत्याने जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा एक फेक प्रोफाईल बनवून सेक्स चॅटसाठी त्यांचा मोबाईल नंबर व्हायरल केला. या अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या ज्येष्ठ नागरिकाला अचानक सारखे सारखे सेक्स चॅटसाठी फोन येत होते. एका अज्ञात व्यक्तीने महिलेचे फेक प्रोफाईल बनवून पुरुषांना त्यांचा क्रमांक दिला होता. ज्या अज्ञात व्यक्तीने हे प्रोफाईल बनवले होते त्याने या वृद्ध व्यक्ती आणि त्याच्या पत्नीकडून १.२६ लाख रुपये उकळले होते, ते परत न देण्यासाठी त्याने हा खटाटोप केल्याचे समोर आले आहे.

या वृद्ध व्यक्तीच्या पत्नीला फेसबुकवर एका अज्ञात व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. नंतर आपण आर्थिक सल्लागार असून गुंतवणूक करण्याचा सल्ला त्याने वृद्ध पत्नीला दिला. तसे त्यांनी १.२६ लाख रुपये विमा आणि म्युच्युअल फंडात गुंतवण्यासाठी या व्यक्तीला ऑनलाईन ट्रान्सफर केले. काही दिवसांनी विमा कंपनीत चौकशीसाठी वृद्ध दाम्पत्याने फोन केल्यावर त्या व्यक्तीने हे पैसे कुठेच गुंतवले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी या व्यक्तीकडे पैसे परत मागितले. पण पैसे परत करण्याऐवजी या अज्ञात व्यक्तीने त्यांना आणखी त्रास देण्यास सुरुवात केली. एक खोटे प्रोफाईल बनवून त्यावर एका महिलेचे फोटो पोस्ट केले. या प्रोफाईलच्या माध्यमातून पुरुषांशी चॅट करून त्यांन या वृद्धाचा क्रमांक देऊन सेक्स चॅट करण्यास सांगितले. वृद्ध व्यक्तीस असे भरपूर फोन आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, पोलीस आता पुढील तपास करत आहेत.