फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून आर्थिक गंडा, नवी मुंबई पोलिसांकडून सावधानता बाळगण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेबिट, क्रेडिट कार्डच्या नावाने गंडा घालणच्या टोळीने एक नवीन शक्कल लढवली आहे. फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून काहींनी ऑनलाईन पैसे लुटण्याचा प्रकार सुरू झाला आहे. काही लोक फेसबुक प्रोफाईल हॅक करून मेसेंजरवर जवळच्या व्यक्तीला संपर्क साधतात. आणि सध्या पैशांची गरज आहे, सांगून ऑनलाईन पैसे उकळतात. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.


काही लोक नागरिकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक करत आहेत. प्रोफाईल हॅक केल्यनंतर युजरच्या जवळच्या व्यक्तीला मेसेंजरमधून संपर्क साधला जातो. नंतर सध्या आपण अडचणीत आहोत. आपल्या पैशांची गरज आहे असे समोरच्या व्यक्तीकडून सांगण्यात येते. आपली ओळखीची व्यक्ती असल्याने अनेक लोक समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवतात आणि फसवणूक होत आहे. या पार्श्वभुमीवर नवी मुंबई सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध होण्याचे आवाहन केले आहे. तसेच काही सूचनाही केल्या आहेत.

नवी मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की सध्या FACE BOOK MESSENGER APPLICATIONS चा मोठ्या प्रमाणात COMMUNICATION करीता वापर केला जात आहे. परंतु सध्या बर्यापच नागरिकांचे Face book Profile हॅक होत असुन Face book Meseenger द्वारे त्यांच्या मित्र मैत्रिणींना भावनिक संदेश पाठवुन अडचणित असल्याचे भासवुन google pay, paytm चे खाते देवुन पैशाची मागणी करीत आहेत. यामध्ये दवाखान्यामध्ये अॅडमिट आहे आर्थिक अडचणीत आहे असे सांगितले जात असुन सदर प्रकारामुळे नवी मुंबई शहरातील अनेक नागरीकांची मोठया प्रमाणात फसवणुक होत आहे.

  • सदर घटनेच्या अनुषंगाने प्रतिबंधक उपाय म्हणून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, computer, Laptop किंवा Mobile यावर SOCIAL NETWORKING SITES Login केल्यानंतर Logout करावे.
  • शक्यतो SOCIAL NETWORKING SITES वापरण्यासाठी स्वत:चेच Computer, Laptop किंवा Mobile चा वापर करावा, जेणेकरून आपल्या FACE BOOK PROFILE गैरवापर होण्यापासुन आपण स्वत:चा बचाव करू शकतो.
  • Face book वापरतेवेळी SETTING मध्ये two way factor authentication चा option on करावा.
    Face book MESSENGER वापर करीत असताना समोरील व्यक्तीस मोबाईल स्क्रीन दिसणार नाही अशी सेटींग करावी.
  • Face book करीता पासवर्ड हा STRONG / ALPHANUMERICअसावा.
  • कोणतीही नवीन वेबसाईटचा वापर करताना login with face book हा option टाळावे.
  • अशा प्रकारचे संदेश प्राप्त होताच भावनीक न होता प्रथम फोनद्वारे संपर्क करून खात्री करावी.