
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अनेक गोष्टी ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या. त्यात शिक्षणाचा क्रमांक सर्वात वरचा होता. पण, याच दरम्यान ऑनलाईन पद्धतीचे गुन्हे देखील वाढल्याचे प्रकार घडले आहेत. अशीच एका घटना अमेरिकेतील विद्यापीठात घडली आहे.
अमेरिकेतल्या एका विद्यापीठाच्या प्राध्यापकाने ऑनलाईन लेक्चरमध्ये हस्तमैथुन केल्याची घटना घडली आहे. हॉवर्ड रॉबिन्सन असं या प्राध्यापकाचं नाव आहे. तो 69 वर्षं वयाचा आहे. न्यू यॉर्कच्या फोर्डहम विद्यापीठाने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
ऑनलाईन लेक्चरच्या वेळी हॉवर्डने हस्तमैथुन केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. हा प्रकार एका विद्यार्थिनीने व्हिडीओत चित्रीत केला. त्यानंतर तिने तो व्हिडीओ तिचा भाऊ आणि प्रियकरालाही दाखवला होता. तिने या प्रकाराविरुद्ध विद्यापीठात तक्रार दाखल केली.
विद्यापीठाने तो व्हिडीओ पाहून त्याची सत्यता पडताळली आणि हॉवर्डला नोकरीतून बडतर्फ केलं. त्यानंतर त्याने विद्यापीठावर प्रत्यारोप केले. त्याच्या दाव्यानुसार, तो नपुंसक आहे. त्याला हस्तमैथून करता येत नाही. उलट त्याला लघवीचा त्रास आहे, असा दावा त्याने केला.
मात्र, या आरोपाला विद्यापीठाने खोडून काढलं असून त्या व्हिडीओची सत्यता पडताळूनच मग त्याच्यावर कारवाई केली गेल्याचं विद्यापीठाने म्हटलं आहे. त्याने आपल्याला या वयात अनेक शारीरिक त्रास असल्याचं सांगून निव्वळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, असंही विद्यापीठाचं म्हणणं आहे.




























































