
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कागदपत्रांची आता ऑनलाइन पडताळणी होणार आहे. दरवर्षी विद्यापीठात 20 हजारांपर्यंत कागदपत्रे पडताळणीसाठी येतात. आतापर्यंत या कागदपत्रांची पडताळणी पारंपरिक पद्धतीने होत असल्याने या कामात बराच वेळ लागत होता. मात्र आता हीच पडताळणी ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दोन ते तीन दिवसांत होणार आहे. या ऑनलाइन कागदपत्र पडताळणीच्या पोर्टलचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे पुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार पडले. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रपुलगुरू डॉ. रवींद्र पुलकर्णी व पुलसचिव प्रा. सुधीर पुराणिक हे उपस्थित होते.
परीक्षा भवनमध्ये अधिकाधिक पारदर्शकता येण्यासाठी डिजिटायझेशन व विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यापुढे एण्ड टू एण्ड हे तंत्रज्ञानही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑनलाइन पडताळणी हा त्याचाच एक भाग आहे, असे यावेळी बोलताना डॉ. पेडणेकर म्हणाले. ऑनलाइन कागदपत्र पडताळणीमध्ये विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या www.mu.ac.in/examination/online document verification या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर त्याला सर्व गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र हे अपलोड करावे लागतात. यानंतर परीक्षा विभागातील पडताळणी करुन दोन ते तीन दिवसांत पडताळणीच्या अहवालचा ई-मेल विद्यार्थ्यास व संबंधित विद्यापीठास किंवा कार्यालयाकडे पाठविला जातो. पूर्वी या प्रक्रियेस एक महिना लागत होता.
25 वर्षांच्या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन
ऑनलाइन प्रक्रियेसाठी परीक्षा विभागातील निकालाचे 25 वर्षांच्या दस्तऐवजाचे डिजिटायझेशन करण्याचे कार्य सुरू असून साठ लाख दस्तऐवज ऑनलाइन पडताळणीसाठी उपलब्ध आहेत. कोणत्याही वर्षाच्या विद्यार्थ्याचे त्याची परीक्षा, महिना, वर्ष व आसन क्रमांकाच्या आधारावर निकालाचे दस्तऐवज तत्काळ उपलब्ध होतील. या आधारावर दोन ते तीन दिवसांत पडताळणीचा ई-मेल संबंधित विद्यार्थ्याला किंवा संस्था यांना केला जातो. पडताळणीचे कार्य विद्यापीठाच्या गुण व प्रमाणपत्र विभागाचे उपपुलसचिव हिंमत चौधरी, सहाय्यक पुलसचिव योगिनी सुर्वे व त्यांच्या कर्मचाऱयांकडून केले जाते.





























































