अमेरिकेत भरबाजारात गोळीबार, हल्लेखोरांसह सातजण ठार

686

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भरबाजारात अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात एका पोलिसासह सात जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन हल्लेखोरांचाही समावेश आहे. या घटनेनंतर अमेरिकेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळा, कॉलेज आणि बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे. याचा पोलीस शोध घेत आहेत.

दोन बंदूकधारी व्यक्ती अचानक भरबाजारात घुसल्या. त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करत हल्लेखोर एका दुकानात शिरले. याबद्दल कळताच पोलीस आणि SWAT टीमने दुकानाला चारही बाजूने घेरले. आपण घेरले गेलो आहोत हे पाहताच हल्लेखोरांनी पोलिसांच्या दिशेने गेळीबार करण्यास सुरुवात केली. त्यास पोलिसांनीही प्रत्युत्तर दिली. एक तास ही चकमक सुरू होती. यात एका पोलिसासह सात जण ठार झाले आहेत. यात दोन हल्लेखोरांसह चार नागरिकांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या