उधळपट्टीला ’एआय’ घालणार आता लगाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओपनएआयने आपल्या चॅटजीपीटी यूजर्ससाठी फायनान्स टूल हे फिचर लाँच केले आहे. या चॅटबॉटला प्रश्न विचारू शकता. ‘माझा खर्च प्रमाणाबाहेर होतोय का? किंवा घर खरेदी करण्यासाठी मी आर्थिकदृष्ट्या तयार आहे का?’. यावर चॅटजीपीटी बँक खात्यातील डेटाचे विश्लेषण करून अचूक उत्तर देईल. बँक खात्यांची सुरक्षा आणि डेटा एकत्रीकरणासाठी ओपनएआयने वित्तीय डेटा नेटवर्प क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘प्लेड’सोबत भागीदारी केली आहे.