शस्त्रक्रियेसाठी कॉन्स्टेबलकडून एक लाखाची ‘अंडरटेबल’ वसुली, मुंबई हॉस्पिटलमधील डॉक्टरचा कारनामा

910

मुंबई हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर देवनानी यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल एक लाखाची ‘अंडरटेबल’ रोकड घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे दिले नाहीत तर शस्त्रक्रिया चांगली होणार नाही असे डॉ. देवनानी यांनी ब्लॅकमेल करून पैसे घेतल्याचा आरोप सुनील टिबे या कॉन्स्टेबलने केला आहे.

14 मार्च 2014 साली सुनील टिबे यांचा अपघात झाला होता. तेव्हा त्यांना जखमी अवस्थेत मुंबई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योनजेअंतर्गत उपचार केला जातो. दरम्यान, टिबे यांच्या गुडघ्याची वाटी व टाचेवरील हाड मोडल्याने त्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तेव्हा शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. देवनानी यांनी टिबे यांच्याकडे एक लाखाची मागणी केली.

महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेचे पैसे आम्हाला मिळत नसून ते ट्रस्टला जमा होतात. त्यामुळे तुम्ही मला एक लाख रुपये अंडरटेबल द्या अन्यथा तुमची शस्त्रक्रिया व्यवस्थित करणार नाही असे धमकावल्याचे टिबे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या