Operation Sindoor – सिंधूपासून सिंदूरपर्यंत… हिंदूस्थानचा मोठा बदला; 15 दिवसांत 15 कारवायांनी पाकिस्तानची भंबेरी

जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत होता. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणे हाच हिंदुस्थानी सैन्याचा अजेंडा होता. त्यामुळे हिंदुस्थानने हल्ल्याच्या दिवसापासून पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. यामुळे पाकड्यांची तंतरली आणि त्यांच्या या आर्थिक स्थितीमुळे ते बरबादीच्या मार्गावकडे वाटचाल करत असल्याचे दिसून आले.

पहलगाममधील हल्ल्यानंतरचे 15 दिवस पाकिस्तानला दणका देणारे ठरले. सिंधू पाणी करारापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंतच्या हिंदुस्थानच्या 15 निर्णयांमुळे पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पाणी करार मोडल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट ओढावले आहे. त्याच वेळी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एअर स्ट्राईक करून हिंदुस्थानने पाकड्यांना आपली जागा दाखवून दिली आहे.

15 दिवस 15 मोठे निर्णय ज्यामुळे पाकड्यांची झोप उडाली

1. हिंदुस्थानने पाकिस्तानसोबतचा सिंधू करार रद्द केला. यामुळे पाकिस्तानात पाणी संकट निर्माण झाले आहे. सिंधू नदीमुळे पाकिस्तानातील 17 कोटी लोकसंख्येला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

2. हिंदुस्थानने पाकिस्तानसोबतचे सगळे व्यवहार आणि करार रद्द केले. त्यामुळे हिंदूस्थानातून कोणतेही सामान पाकिस्तानात जात नाहीए. या करारामुळे पाकिस्तानचे कोट्यावधींचे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

3. हिंदुस्थानने चिनाब नदीचे पाणी देखील थांबवले आहे. आधी सिंधू करार रद्द मग चिनाब नदीचे पाणी थांबवल्यामुळे पाकिस्तानची अजूनच कोंडी झाली आहे.

4. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी राजनैतिक पद्धतींचा अवलंब केला. यामुळेच पाकिस्तानला आतापर्यंत कोणत्याही मोठ्या देशाकडून उघड पाठिंबा मिळालेला नाही.

5. हिंदुस्थानने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घातली. यामुळे पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे.
टरबूज, खरबूज, सिमेंट, रॉक मीठ, सुकामेवा, दगड, चुना, कापूस, स्टील आणि चष्म्यासाठीचे ऑप्टिक्स पाकिस्तानमधून हिंदुस्थानात आयात केले जातात.

6 हिंदुस्थानने पाकिस्तानच्या टपाल सेवेवर बंदी घातली. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात होता. इतिहासात पहिल्यांदाच टपाल सेवांवर बंदी घालण्यात आली आहे.

7. हिंदुस्थानने पाकिस्तानी जहाजांच्या प्रवेशावरही बंदी घातली होती. पाकिस्तानी जहाज हिंदुस्थानच्या सीमेवरून बांगलादेशला आपला माल पोहोचवत होते.

8. हिंदुस्थानने पाकिस्तानच्या सर्व लष्करी सल्लागारांना देशातून हाकलून लावले आहे. हिंदुस्थानच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे कठीण झाले आहे.

9. हिंदुस्थानने झेलम नदीचे पाणी पाकिस्तानात सोडले. हिंदुस्थानच्या या निर्णयामुळे पाकिस्तानातील मुझफ्फराबाद भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लोक आपली घरे सोडून पळून गेले आहेत.

10. हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला एकटे पाडले. 5 मे रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानला पाठिंबा मिळालेला नाही.

11. पाकिस्तानला मुस्लिम देशांचाही पाठिंबा मिळू शकला नाही. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हिंदुस्थानचे पंतप्रधान सौदी अरेबियात होते. यावेळी सौदीनेही या दहशतवादी हल्ल्यावर तीव्र टीका केली.

12. हिंदुस्थानने नवी दिल्लीतील सर्व देशांच्या राजदूतांना बोलावून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबद्दल माहिती दिली. यामुळे टीव्हीवरील वादविवादांपासून ते बंद खोलीतील बैठकांपर्यंत दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत प्रत्येत माहिती मिळणे अधीक सोपे झाले.

13. हिंदुस्थानने पाकिस्तानला 14 दिवस आपल्या इशाऱ्यावर नाचवले. हिंदुस्थानने घेतल्या कठोर निर्णयांचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर मार्केटवर दिसून आला.

14. हिंदुस्थानने पाकिस्तान सीमेवर असलेली सलाल आणि बाघलियार धरणे बंद केली. पाकिस्तानला या धरणातून पाणी मिळत होते. याचा वापर पिण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी केला जात होता.

15. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थानने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे.

LIVE अपडेट Operation Sindoor: हिंदुस्थानी सैन्याच्या कारवाईत 70 दहशतवादी ठार