India Pakistan War – कश्मीरमध्ये सीमेवरील गोळीबारात मुंबईतील जवान शहीद, घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण

कश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे जवान शहीद झाले आहेत. कश्मीरमध्ये उरी येथे पाकड्यांशी लढताना आज पहाटे 3.30 वाजता मुरली नाईक यांना वीरमरण आले.

Operation Sindoor – सुरक्षा दलांच्या हालचालींचे लाईव्ह कव्हरेज टाळा, केंद्र सरकारच्या माध्यमांना सूचना

सीमेवरील पाकिस्तानच्या हल्ल्याला हिंदुस्थानच्या लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानच्या लष्कराचे मुंबईत घाटकोपरमध्ये राहणारे आणि मूळचे आंध्र प्रदेशचे असलेल्या मुरली श्रीराम नाईक यांना वीरमरण आले आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान, जम्मू-उधमपूर ते दिल्लीसाठी तात्काळ 3 विशेष गाड्या धावणार

शहीद झालेले मुरली श्रीराम नाईक हे घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये राहत होते. मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली होती. त्यामुळे सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला आपल्या गावी राहण्यास गेले आहे. मुंबईतील घाटकोपरच्या वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांचे शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले. स्थानिकांकडून  त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. मुरली नाईत यांचे वडील श्रीराम नाईक आणि त्यांची आई ज्योती नाईक हे मुंबईत घाटकोपर पूर्वमध्ये असलेल्या पंतनगर पोलीस ठाण्यातील चित्रा डेअरी जवळ, कामराज नगर येथे राहतात. वडील श्रीराम नाईक हे मजुरीचा व्यवसाय करतात.