
पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे क्षेपणास्त्र हल्ला करत उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवाद्यांना खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदुस्थानने दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर कारवाई केली. या कारवाईवर स्वतः पंतप्रधान मोदी बारकाईने लक्ष ठेवून होते. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक घेतली.
Operation Sindoor आता थांबायचे नाही, चून चून के मारो – संजय राऊत
पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान विरोधात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती कॅबिनेटमधील सहकारी मंत्र्यांना दिली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. हिंदुस्थानच्या सैन्याने पूर्ण तयारीनिशी अचूक कारवाई केली. पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत सैन्याचे कौतुक केले.
सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, ऑपरेशन सिंदूरवर विरोधी पक्षांशी होणार चर्चा
ऑपरेशन सिंदूरनंतर राष्ट्रपतींची भेट
कॅबिनेट बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींना पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये राबवण्यात आलेल्या सैन्य कारवाईची ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली.