Operation Sindoor – राजनाथ सिंहांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत घेतली आढावा बैठक; चेहऱ्यावर दिसला पाकला धडा शिकवल्याचा आनंद!

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. जम्मू-कश्मीरमधील लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा अयशस्वी प्रयत्न हिंदुस्थानने उधळून लावला आहे. बैठकीत पाकिस्तानच्या आक्रमकतेवर चर्चा झाली आणि हिंदुस्थानच्या सुरक्षा तयारीवर भर देण्यात आला. या बैठकीतील एक फोटो शत्रूला सूचक संदेश देणारा आहे. हा फोटो व्हायरल होत आहे.

हिंदुस्थानने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सैन्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. ही एक आढावा बैठक होती. ज्यामध्ये हिंदुस्थानी लष्कराने गेल्या काही दिवसांत लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला होता. या बैठकीला सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी उपस्थित होते.

Operation Sindoor – सुरक्षा दलांच्या हालचालींचे लाईव्ह कव्हरेज टाळा, केंद्र सरकारच्या माध्यमांना सूचना

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या बैठकीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रात सर्वांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतरचा हा आनंद असल्याचे म्हटले जात आहे. जम्मू, पठाणकोट, उधमपूर आणि इतर काही ठिकाणी लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा प्रयत्न काल रात्री हिंदुस्थानने उधळून लावला. त्यानंतरही पाकिस्तानकडून आगळीक सुरूच आहे. हिंदुस्थान आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान, जम्मू-उधमपूर ते दिल्लीसाठी तात्काळ 3 विशेष गाड्या धावणार