रत्नागिरी जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी, प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना आणि आपत्कालीन नंबर जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्याता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला असून जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी मार्फत करण्यात येत आहे.

काय दक्षता घ्यावी?

  • मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
  • अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका.
  • घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या.
  • पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
  • हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdimumbai.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी.
  • कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी. किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352)226248 /222233 किंवा टोल फ्री 1077 या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी.
  • अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते अशावेळी नागरिकांनी सतर्क राहावे.
  • आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जसे दरड प्रवण क्षेत्र या ठिकाणी आपण राहत असल्यास प्रशासनाकडून मिळणा-या सूचनांचे पालन करावे.
  • पुरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या बाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
  • जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जावू नये.
  • अतिवृष्टी होत असताना कोणीही समुद्रात, नदी-नाले इ. ठिकाणी जावू नये.
  • अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी.
  • पुराच्या पाण्यात समुद्रात नागरिकांनी सेल्फी काढू नये. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी केले आहे.

आपत्कालीन नंबर जाहीर

1. जिल्हा नियंत्रण कक्ष – 02352- 226248/222233
2. पोलीस नियंत्रण कक्ष – 02352-222222
3. राजापूर तहसील कार्यालय – 02353-222027
4. लांजा तहसील कार्यालय -02351- 295024
5. रत्नागिरी तहसील कार्यालय – 02352-223127
6. संगमेश्वर तहसील कार्यालय – 02352-260024
7. चिपळूण तहसील कार्यालय – 02355 – 295004
8. गुहागर तहसील कार्यालय – 02359- 240237
9. खेड तहसील कार्यालय – 02356 – 263031
10. दापोली तहसील कार्यालय – 02358- 282036
11. मंडणगड तहसील कार्यालय 02350-225236