भगव्या रंगातील नवीकोरी ‘वंदे भारत’ तयार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन अशी ओळख असलेल्या ‘वंदे भारत’ची नवी भगव्या-पांढऱया रंगातील देखणी आवृत्ती धावण्यासाठी सज्ज झाली आहे. रेल्वेच्या चेन्नई येथील इंटेग्रल कोच फॅक्टरीत तयार झालेली ही गाडी आज बाहेर पडली असून ती लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होणार आहे. गेल्या तीन महिन्यांसाठी या गाडीच्या बांधणीचे काम सुरू होते.
देशाच्या कानाकोपऱयात रेल्वेचे नेटवर्क असले तरी तेथे चालणाऱया गाडय़ांचा वेग कमी असून त्यात मिळणाऱया सेवा-सुविधा मर्यादित स्वरूपाच्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवासाचा वेग वाढण्याबरोबरच प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता यावा म्हणून वंदे भारत ट्रेन तयार केली आहे. सध्या देशभरात 28 मार्गावर निळ्या-पांढऱया रंगाच्या वंदे भारत ट्रेन धावत असून त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर रेल्वेने आता वंदे भारतच्या रंगसंगतीमध्ये बदल करत भगवा-पांढरा असा केला आहे. सदर गाडीच्या बांधणीचे काम पूर्ण झाले आहे.