देशात गेल्या चार महिन्यांत 18 हजार टन जैविक कचरा, सर्वाधिक जैविक कचरा महाराष्ट्रात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात गेल्या चार महिन्यात तब्बल 18,006 टन इतका जैविक कचरा गोळा करण्यात आला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक जैविक कचरा गोळा करण्यात आला असून राज्यात गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्रात सुमारे 3 हजार 587 टन इतका कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने जाहीर केली आहे.

देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात पोहचली असून यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या उपचारा दरम्यान मोठय़ा प्रमाणात जैविक कचरा निर्माण झाला आहे. देशात सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक जैविक कचरा गोळा करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल 5 हजार 500 टन इतक्या मोठय़ा प्रमाणात जैविक कचरा गोळा करण्यात आल्याचे केंद्रीय प्रदूषण नियमाक मंडळाने जाहीर केले आहे.

या जैविक कचऱयामध्ये प्रामुख्याने पीपीई किट्स, मास्क, ग्लोज, ह्युमन टिश्यू, शूज कव्हर यांचा सहभाग आहे. याशिकाय उपचरासाठी वापरण्यात आलेले प्लास्टर, कापूस, सुई, रक्ताच्या पिशव्या, इंजेक्शन याशिकाय इतर जैविक कचऱयाचा समावेश आहे.