
एकल श्रीहरी मुंबईतर्फे येत्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामूहिक यज्ञ केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय केडिया यांनी दिली आहे. वीरेंद्र याज्ञिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झूमच्या माध्यमातून सकाळी 10 ते सकाळी 10.30 या वेळेत होणार आहे. या व्यतिरिक्त संस्थेने 19 जूनपासून योगशिबिराचे आयोजन केले असून योगगुरू शारदा आर. बुबनाच्या उपस्थितीत दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत हे शिबीर होणार आहे. त्याचबरोबरा दर बुधवारी आणि रविवारी संस्थेतर्फे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती एकल श्रीहरी मुंबईतर्फे देण्यात आली आहे.



























































