
जागतिक सिनेसृष्टीमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ऑस्कर सोहळा उद्या 11 मार्च रोजी आहे. लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा रंगेल. यंदाच्या पुरस्कारांत ‘ओपनहायमर’ला 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळालेले आहे. यंदा एकाही हिंदुस्थानी सिनेमाला नामांकन मिळालेले नाही. गेल्या वर्षी हिंदुस्थानला दोन ऑस्कर मिळाले होते.
रंजक इतिहास… श्वानाला मिळणार होता पहिला अॅवॉर्ड
1929 साली पहिला अॅकॅडमी पुरस्कार एका श्वानाला द्यावा, असे ज्युरींना वाटत होते. या श्वानाचे नाव रिन टिन टिन होते. रिनला पहिल्या महायुद्धाच्या काळात फ्रान्समध्ये वाचवण्यात आले होते. त्यानंतर रिनने हॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याचे चार सिनेमे 1929 साली प्रदर्शित झाले होते. त्यामधील रिन श्वानाने जबरदस्त काम केले होते. त्यामुळे त्यालाच पुरस्कार द्यावा असे जुरींचे म्हणणे होते. मात्र एका श्वानाला पहिला ऑस्कर दिल्याने चुकीचा संदेश जाईल, असे अॅपॅडमीच्या अध्यक्षांचे म्हणणे होते. त्यामुळे पुन्हा मतदान घेऊन अभिनेता एमिल जेनिंग्ज यांना पहिला
ऑस्कर देण्यात आला.



























































