
कॉस्ट्यूम डिजाइनर आणि हिंदुस्थानच्या पहिल्या ऑस्कर विजेत्या भानु अथैया यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. कुलाब्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्या गेल्या अनेक वर्षांपासून ब्रेन ट्युमर या आजाराने ग्रासले होते.
रिचर्ज एंटनबरो यांच्या जगप्रसिद्ध गांधी या चित्रपटासाठी भानु अथाया यांना 1982 सालचा सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर अवॉर्ड मिळाला होता. हा पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या हिंदुस्थानी होत्या. 2012 साली ब्रेन ट्युमरचे निदान झाल्यानंतर त्यांनी शस्त्रक्रीया करण्यास नकार दिला होता. त्यानंतर 2015 मध्ये त्यांना पॅरालिसीसचा झटका आला होता.



























































