
चित्रपटक्षेत्रामध्ये मानाचा समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांची आज घोषणा झाली. हिंदुस्थानच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू‘ या गाण्याला सर्वोत्कृष्ट अभिजात गीत (बेस्ट ओरिजिनल साँग) या विभागामध्ये तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघु माहितीपटाला लघु माहितीपट विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाला.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर प्रेझेन्टर म्हणून जबाबदारी निभावली.
दीपिकाने काळ्या रंगाचा मनमोहक गाऊन घातला होता. मंचावर तिचे आगमन होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
बन हेअरस्टाइल व मेकअप करत दीपिकाने ग्लॅमरस लूक केला होता. यावर मॅचिंग दागिनेही तिने घातले होते.
रेड कार्पेटवरील दीपिकाचे फोटो व्हायरल होत असून तिच्या मानेवरील टॅटूने नेटकऱ्याचे लक्ष वेधूले आहे.