
गेल्या अनेक दिवसांपासून ‘जून’ चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यात अभिनेत्री नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत आहेत. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे हेड आणि फाउंडर अक्षय बर्दापूरकर यांनी 30 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले आहे. नेहमी नजरेआड राहणारं बाप-मुलाचं नातं आणि आयुष्याच्या एका वळणावर अनपेक्षितपणे समोरं येणारं मैत्रीपलीकडचं नातं यांची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘जून’. या चित्रपटाचे लेखन निखिल महाजन यांनी केले आहे. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘जून’ चित्रपट प्रदर्शन होण्यापूर्वीच अनेक नामांकित फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजला असून सिद्धार्थ मेनन याला सर्वेत्पृष्ट अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला आहे.



























































