
सामना ऑनलाईन । मुंबई
प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करू पण ओवैसींसोबत चर्चा कधी करणार नाही हे काँग्रेसचे विधान एमआयएमचे सर्वेसर्वो असदुद्दीन ओवैसी यांना चांगलेच लागले आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधतानाच चांगलेच सुनावले आहे.
एका सभेत बोलताना ओवैसी म्हणाले की, ऐकलं का राहुल गांधी… ऐकलं का अशोक चव्हाण… हे मी दोन्ही काँग्रेसला आणि शरद पवारांना सांगतो आहे. माझे मोठे बंधू प्रकाश आंबेडकर यांच्याशी तुम्ही चर्चा करा आणि त्यांना लढण्यासाठी सन्मानपूर्वक जागा, अशा शब्दात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले आहे.
आता यासगळ्याला आता काँग्रेस-राष्टवादी कसे उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
A Owaisi: You say talks can be held with Prakash Ambedkar but not AIMIM. Listen Rahul Gandhi, listen Ashok Chavan I’m saying this to both Congress & Sharad Pawar, talk to my elder brother Balasaheb Ambedkar & give him a respectful share of seats, I don’t need a single seat.(17-1) pic.twitter.com/wfRi3HGQwV
— ANI (@ANI) January 18, 2019
































































