अंधेरे में एक प्रकाश…ऑक्सफर्डची कोविशिल्ड! पहिला डोस 90 टक्के, दुसरा डोस 62 टक्के गुणकारी

कोरोना संपवणारी लस कधी येणार याच्या प्रतीक्षेत संपूर्ण जग असतना ऑक्सफर्डची लस पहिल्या टप्प्यात 90 टक्के तर दुसऱया टप्प्यात 62 टक्के प्रभावी ठरल्याचे दिलासादायक वृत्त समोर आले आहे. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपन्यांची कोरोना लस 70 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

पहिल्या टप्प्यात देण्यात आलेली ही लस 90 टक्के प्रभावी ठरली आणि महिनाभराच्या अंतराने देण्यात आलेल्या दुसऱया टप्प्यात 62 टक्के प्रभावी ठरली असून या दोन्हीची सरासरी काढल्यास ही लस 70.4 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

चाचण्या यशस्वी झाल्यास ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनेका भागिदारीतून पुढच्या वर्षअखेरपर्यंत जगामध्ये 3 अब्ज डोस उपलब्ध करुन देणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत हिंदुस्थानात ऑक्सफर्डची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या लसीची उपलब्धता सर्वप्रथम डॉक्टर्स, नर्स, पोलीस तसेच कोरोनासंबंधी काम करणाऱया कर्मचाऱयांना देण्यात येणार आहे.

ऑक्सफर्डच्या लसीची बाजारपेठेतील किंमत ही 500 ते 600 रुपये असण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानची लोकसंख्या लक्षात घेता केंद्र सरकार या लसीची खरेदी मोठय़ा प्रमाणात करणार असल्याने सरकारला ही लस 225 ते 300 रुपयांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

10 कंपन्यांच्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात

ऑक्सफर्डप्रमाणेच फायजर या औषध कंपनीची लस 90 टक्के प्रभावी आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे आधी दिसत नव्हती त्यांच्यावर ही लस प्रभावी ठरली आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. तर अमेरिकेतील मॉडर्ना या कोरोना लस निर्माण करणाऱया कंपनीने त्यांची लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. जगभरात सध्या किमान 10 कंपन्यांच्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे

आपली प्रतिक्रिया द्या