भाजपला हरविण्यासाठी काँग्रेस लहान भाऊ होण्यास तयार – चिदंबरम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर कॉँग्रेसच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी भाजपला हरवण्यासाठी आपला पक्ष लहान भाऊ होण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत तडजोडीची भूमिका स्वीकारण्याची तयारी दर्शवत त्यांनी अन्य पक्षांशी युती करण्याचे संकेत दिले आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कॉँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचे मत क्यक्त केले. तसेच 2024 मधील लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि डीएमकेसारख्या पक्षांसोबत युती करून लहान भाऊ म्हणून लढण्यासाठी सज्ज आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपला पक्ष तडजोड करण्यास तयार असून प्रत्येक पक्षाला ती करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात राज्याराज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन लढल्यास त्यांचा पराभव करणे शक्य आहे. त्यासाठी तडजोड फक्त काँग्रेसच करेल असे नाही, तर प्रत्येक पक्षाला करावीलागेल. बंगालमध्ये आपल्याला तृणमूलच्या नेतृत्वाखाली  तर पंजाबमध्ये ‘आप’च्या नेतृत्वाखाली लढावे लागेल, असं चिदंबरम म्हणाले.

ऑगस्टमध्ये कॉँग्रेसला नवीन अध्यक्ष

पाच राज्यांतील पराभकानंतर सोनिया गांधी यांनी सीडब्ल्यूसीच्या बैठकीत राहुल आणि प्रियंका यांच्यासह पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्याची तयारी सीडब्ल्यूसीच्या बैठकीत दर्शविला. तसेच पक्षाच्या अध्यक्ष निवडीसाठी लवकर निवडणुका घेण्याचे सुचविले होते, परंतु कमिटीने हे मान्य केले नाही. आता आमच्याकडे कोणता पर्याय आहे? काँग्रेसच्या नकीन अध्यक्षाच्या निकडीची प्रक्रिया केगकान करण्याची गरज आहे. पण ते ऑगस्ट महिन्यात शक्य होईल, असे चिदंबरम यांनी सांगितले.

 उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी एकाच वेळी पक्षाची पुनर्बांधणी करणे आणि निवडणूक लढवणे या दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना इशारा दिला होता की, दोन्ही एकाच वेळी होऊ शकत नाहीत. पक्षाची पुनर्बांधणी आधी झाली पाहिजे आणि नंतर निवडणूक लढवता येऊ शकते, पण दुर्दैवाने पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक एकाच वेळी झाली, असे चिदंबरम म्हणाले.