पद्मजा तरडे यांचे निधन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पद्मजा तरडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना शाखा क्रमांक 10 चे माजी शाखाप्रमुख जितेंद्र तरडे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या अंत्ययात्रेला शिवसेना आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, उपविभाग प्रमुख विनायक सामंत यांच्यासह शिवसेनेतील विविध पदाधिकारी तसेच समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.