
महाराष्ट्रातील बॅडमिंटनच्या गुणवत्तेला शोधण्यासाठी सुरू झालेल्या पदुकोण अकादमीत नवी मुंबईतील 9 ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी बॅडमिंटनच्या निवड चाचणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर 17 जूनपासून सुरू होईल.
या शिबिरात राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील खेळाडूंनाही आपले काwशल्य दाखविण्याची संधी पदुकोण अकादमीने दिली आहे. या अकादमीत अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे खेळाडूंना सर्वोच्च दर्जाच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या अकादमीत खेळाडूंना तावून सुलाखून तयार केले जात असल्यामुळे जी गुणवत्ता बाहेर पडणार ते सोळा आणे सोनंच असणार असा विश्वास अकादमीला आहे.
बॅडमिंटनचे चॅम्पियन घडवणाऱया या अकादमीत होतकरू आणि उदयोन्मुख खेळाडूंनाच संधी दिली जाणार आहे. या निवड चाचणी शिबिराच्या अधिक माहितीसाठी 7838749749 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.































































