
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानच्या सैन्याचा माजी कमांडर हाशिम मूसा आणि त्याचे साथिदार कश्मिरमध्ये दाट जंगलात लपूले आहेत. आणि त्यांना घेरण्यात येत आहे.
दहशतवादी जंगलात लपून असल्याचा दाट संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना घेरण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. मूसा आणि त्याचे साथिदार युरोपमधील Alpine Qest अॅपचा वापर करत आहे. हे अॅप इंटरनेट आणि जीपीएसशिवाय जंगलांमध्ये ट्रेकिंगसाठी वापरले जाते.
हे दहशतवादी एका चिनी मिलिट्री कम्युनिकेशन डिवाईसचाही वापर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे डिवाईस चिनी सैन्याने पाकिस्तानी सैन्याला दिली असणार आणि आता ते ISI च्या मार्फत दहशतवाद्यांपर्यंत पोहोचले असेल. जगभरातील अॅडव्हान्स आर्मी या डिवाईसचा उपयोग युद्धजन्य परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी करतात. या डिवाईसने कमांड सेंटरशी संपर्क साधण्यासह व्हिडिओही पाठवता येतात.