
प्रसिद्ध चित्रकार महेश करंबेळे यांनी अमूर्तवादी संकल्पनेतून साकारलेल्या पारदर्शकता व मनाचा ठाव घेणाऱया चित्राकृतीचे प्रदर्शन नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सुरू आहे. चित्रकार महेश करंबेळे हे रत्नागिरी येथील कोट गावचे. त्यांनी देशविदेशात नावलौकिक मिळविला आहे. फ्रान्स, पोर्तुगाल, लंडन, सिंगापूर, जर्मनी, ऍमस्टरडॅम, दुबई आणि देशविदेशातील कित्येक मान्यवर कलासंग्रहकांकडे त्यांच्या चित्रांचा संग्रह आहे. पारदर्शकता आणि जडत्वाच्या लयबद्ध विविध छटा त्यांच्या या चित्रातून पाहावयास मिळतात. करंबेळे यांच्या चित्रांचे प्रदर्शन 6 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत रसिकांना विनाशूल्क पाहता येणार आहे.

























































